चार मे ला स्वराज्य प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात करणार प्रवेश
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोणत्याही जाती धर्माला थारा न देणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये येत्या चार मे रोजी हजारो कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश करीत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर नव्या उमेदीने पुन्हा राजकारण, समाजकारणात सक्रिय होणार असून पक्ष माझ्यावर जी जबाबदारी दिली ती स्वीकारून ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल अशी माहिती स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुलकार्तिकेय पार्वती महादेव यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान यापूर्वी संदिप मोझर नावाने परिचित होतो मात्र आता रकुलकार्तिकेय पार्वती महादेव या नवीन नावाने मी समाजासमोर जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांचे पुत्र कुमार कनिष्क महादेव, संदिप जाधव, मनीषा चव्हाण, भारती गावडे, नितीन सुतार आदी उपस्थित होते.
रकुलकार्तिकेय पुढे म्हणाले, यापूर्वी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांमध्ये होतो. त्यावेळी केलेली आंदोलने ही सातारा जिल्ह्यामध्ये दिशादर्शक ठरली.राजकारण आणि समाजकारण या दोन्ही माध्यमात आपण हिरीरीने काम केले आहे .वाई व पाटण या दोन तालुक्यात सव्वा लाख पेक्षा अधिक मोतीबिंदूची ऑपरेशन शिबिरे राबवून समाजातील गोरगरिबांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
मागील काळात काही व्यक्तिगत अडचणीमुळे राजकीय आणि सामाजिक प्रवाहापासून मी दूर होतो .मात्र माझा अध्यात्मिक प्रवास आता सातत्याने कायम असून मी महादेवाची उपासना करत आहे .सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म लघु कर्ज क्षेत्रामध्ये वित्तीय कंपन्या गरजू माता भगिनींना विशिष्ट व्याजदराने कर्ज देऊन त्यांना सहाय्य करतात. मात्र व्याजदराच्या मुद्द्यावर त्यांना फसवले जाते व्याजदराची टक्केवारी वाढवण्यात येऊन गरजू महिलांचा गैरफायदा घेतला जातो त्यामुळे त्या आर्थिक दृष्ट चक्रामध्ये अडकत जातात त्यामुळे स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील माता-भगिनींना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील.
कोणत्याही जाती धर्माला थारा न देणारा राष्ट्रवादी पवार शरदचंद्र पवार पक्षांमध्ये मी येत्या चार मे रोजी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत प्रवेश करणार आहे. शरदचंद्र पवार यांची सभा चार मे रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार आहे.हा प्रवेश भगव्या ध्वजांसह राहणार आहे. मी एक शिवभक्त असून शिवप्रेरणेच्या विचारांचा एक सच्चा मावळा आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचे प्रश्न घेऊनच मी पुन्हा समाजकारणात प्रवेश करतो आहे.
मायक्रो फायनान्स चळवळीच्या संबंधात पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाती-धर्मांना प्राधान्य देणारे आता त्या पक्षापासून दूर गेले आहेत. त्यामुळे हाच एक पक्ष सर्वधर्म विचारांना प्राधान्य देतो म्हणून या पक्षात मी प्रवेश करत आहे व पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल.असेही रकुलकार्तिकेय पार्वती महादेव यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.