सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम या मुंबई येथील कॉलेज मध्ये शिकत असलेल्या कु. आदित्य विश्वनाथ भिलारे याने ‘ महाबळेश्वर मधील कृषी पर्यटनाच्या संधी ‘ या विषयावर संशोधन केले असून त्याला मुंबई विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळाला आहे. याबद्दल आदित्यचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुंबई येथील भारती विद्यापीठ येथे शिकत असणाऱ्या कु. आदित्य भिलारे याला महाबळेश्वर या पर्यटन स्थळाची म्हणजेच मूळ पुस्तकांचे गाव भिलार या कृषी पंढरीचा वारसा असल्याने त्याने ‘ महाबळेश्वर मधील कृषी पर्यटनाच्या संधी ‘ हा विषय घेवून विद्यापीठाला आपला प्रबंध सादर केला.
मंत्रिमंडळाने कृषी पर्यटनाचे धोरण निश्चित केल्यानंतर महाबळेश्वर तालुक्याला मोठी संधी प्राप्त झाली. त्यानंतर अख्खा तालुका कृषी पर्यटनातून आर्थिक सक्षम झाला. भिलार या पुस्तकांच्या गावाच घर अन घर स्ट्रॉबेरी शेती, कृषी पर्यटन निवास, पुस्तकांचं घर यामुळे आर्थिक चलनवलन वाढले. पर्यटक अगदी शेतात येवू लागले, राहू लागले त्यामुळे याचा जवळून अभ्यास आदित्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना आहे. त्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय अगदी वातावरण जगून घेवून केल्याने या प्रबधाला यश लाभले.
पर्यटक शहरा कडचा कोलाहल विसरून आणि प्रदूषण मुक्त वातावरणाचा आस्वाद घेतील तसेच ताजी फळे व भाजीपाला खरेदी करू शकतील यासाठी महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ कृषी पर्यटनासाठी उपयुक्त असल्याचे यात मांडले आहे.
याबद्दल आदित्य चे त्याचे कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक व महाबळेश्वर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
You must be logged in to post a comment.