शेंद्रे येथील आयटीआयमध्ये प्रवेश निश्चित करावा : वेदांतिकाराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : ज्या विद्यार्थ्यांना शासकीय आय.टी.आय.ला प्रवेश मिळाला नाही, अशा इच्छुक विध्यार्थ्यांना दि. २९ व ३० डिसेंबर हे दोन दिवस समुपदेशन फेरीची संधी उपलब्ध झाली आहे. याचा लाभ इच्छुक विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि शेंद्रे ता. सातारा येथील छ. शाहू आय.टी.आय. येथे समक्ष येऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य शिक्षण मिळावे यासाठी विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टने छ. शाहू आय.टी.आय.हि नवीन संस्था २०१८- १९ पासून सुरु केली आहे. या संस्थेला एन. सी. व्ही. टी. नवी दिल्ली, डी. जी. इ. टी. नवी दिल्ली कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांची संलग्नता प्राप्त झाली असून महाराष्ट्र शासनाचीही मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष २०१८- १९ पासून संस्थेमध्ये फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर हे ट्रेड सुरु असून इलेकट्रीशियन साठी २०, फिटर साठी २० आणि वेल्डर ट्रेडसाठी ४० अशी प्रवेश क्षमता आहे.
संस्थेने नव्याने सुरु केलेल्या फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर या कोर्सला सातारा, कोरेगाव, कराड व फलटण तालुक्यातील विध्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इच्छुकांनी समुपदेशन फेरीचा लाभ घ्यावा आणि प्रवेश निश्चित करावा, असे वेदांतिकाराजे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!