सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): शिवाजी विद्यापीठाचा ४१ वा सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे जल्लोषात पार पडला. या महोत्सवात १४ प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून साताºयातील छत्रपती शिवाजी कॉलेजने लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.
स्पर्धेतील सर्व विजेते व विजेत्या संघांचे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सव समितीचे सचिव व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, युवामहोत्सव समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. वाय. बी. गोंडे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, सातारा जिल्हा सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. सी. यू. माने, सातारा जिल्हा युवा महोत्सवाच्या प्रमुख चेअरमन डॉ. रोशनआरा शेख यांनी अभिनंदन केले.
छत्रपती शिवाजी कॉलेजने सर्व प्रकारची व्यवस्था करून योग्य काळजी घेऊन युवा महोत्सव आयोजन केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव समितीने समाधान व्यक्त केले.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे :
वक्तृत्व मराठी : इस्माईल साहेब मुल्ला लॉकॉलेज सातारा, शिवाजी कॉलेज सातारा, गव्हमेंट कॉलेज आॅफ इंजिनियरिंग कराड
वक्तृत्व हिंदी : कला वाणिज्य महाविद्यालय सातारा, डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव, मुधोजी कॉलेज फलटण
वक्तृत्व इंग्रजी : वेणूताई चव्हाण कॉलेज कºहाड, गव्हर्न्मंेट कॉलेज आॅफ इंजिनियरिंग कºहाड, डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव
वादविवाद : गव्हर्न्मेंट कॉलेज आॅफ इंजिनियरिंग कॉलेज कºहाड, इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज, डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव
सुगम गीत गायन : गव्हर्न्मेंट कॉलेज आॅफ इंजिनियरिंग कॉलेज कºहाड, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कºहाड
भारतीय समूहगीत स्पर्धा : सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कºहाड, यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्यूट आॅफ सायन्स सातारा, धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय सातारा
एकांकिका : सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज
लघुनाटिका : धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय सातारा, मुधोजी महाविद्यालय फलटण, यशवंतराव चव्हाण इन्सटीटुयट आॅफ सायन्स
नकला : यशवंतराव चव्हाण इन्सटीट्यूट आॅफ सायन्स सातारा, मुधोजी कॉलेज फलटण, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण
पथनाट्य : सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कºहाड, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, यशवंतराव चव्हाण इन्सटीटुयट आॅफ सायन्स सातारा
लोकनृत्य स्पर्धा : छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय सातारा, यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्यूट आॅफ सायन्स सातारा
लोककला : सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कºहाड, दहिवडी कॉलेज दहिवडी, किसनवीर महाविद्यालय वाई
लोकसंगीत व वाद्यवृंद : मुधोजी महाविद्यालय फलटण, डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव
You must be logged in to post a comment.