सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) राज्यातील सर्वात मोठ्या कोयना धरणावर चोवीस तास कडक सुरक्षा असते. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने वायरलेस यंत्रणा सज्ज असते. मात्र, हरिहरेश्वर येथील समुद्र किनारी संशयास्पद बोटीत घातक शस्त्रे आढळल्यानंतर कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. उद्योग विश्वाचा कणा असणाऱ्या या धरणाच्या सुरक्षेला शासनाचे कायमच प्राधान्य असते.
कराड-पाटण मार्ग हा कोकणचे प्रवेशद्वार आहे. या मार्गावर सध्या नाकाबंदी करण्यात आली आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द असणाऱ्या घाटमाथ्यावर कोकणातून कराडकडे येणाऱ्या आणि कराडहून कोकणात जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.
कोयना धरणाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तीन पोलीस अधिकारी, ५२ पोलीस कर्मचारी आणि ३४ गृहरक्षक दलाचे जवान, असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच धरणाच्या सुरक्षेची दर तासाला पाहणी केली जात आहे.
You must be logged in to post a comment.