सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सैन्यदलात जाण्यासाठी अनेक तरूणांनी भरतीपूर्व तयारी केली आहे. मात्र कोरोनामुळे दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया बंद आहे. कोरोना संकटाचे सावट कमी होत असल्याने केंद्र सरकारने सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना दिलासा द्यावा. भरती अभावी संधी गमावलेल्या युवकांना खासबाब म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत नियम 377 नुसार तातडीचे व लोकहितासाठी महत्वाचे मुद्दे सादर करून सभागृहांच्या पटलावर ठेवले. खासदार पाटील म्हणाले, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती बंद आहे. कोरोनाने ओढावलेल्या परिस्थितीमुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत आहे. परिणामी त्यांची आलेली संधी हुकत असून त्यांचे स्वप्न हिरावून जात आहे. कोरोना महामारीचा प्रभाव आता कमी झाला आहे.
You must be logged in to post a comment.