सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे. नेहमीप्रमाणे उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवत अजिंक्यतारा कारखाना होवू घातलेल्या हंगामात गाळपास येणार्या ऊसाला किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द आहे, असे आश्वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३- २०२४ च्या गळीत हंगामाकरिता यंत्रसामुग्री देखभाल, दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील पहिल्या रोलर पूजनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कामगार-कर्मचारी उपस्थित होते.
आगामी गळीत हंगामात उच्चतम साखर उतारा व कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त साखरेचे उत्पादन घेणे तसेच उपपदार्थांच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक गाळप हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न करून १००% एफआरपी रक्कम शेतकर्यांना वेळेत अदा केली जात आहे. गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट वेळेत आदा केले असल्यामुळे ऊस उत्पादक, सभासद, बिगर सभासदांमध्ये अजिंक्यतारा कारखान्याबाबत समाधान असून अजिंक्यतारा परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती वनिता गोरे, सतीश चव्हाण, किरण साबळे- पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत, रवी कदम, राहुल शिंदे, मिलिंद कदम, सूर्यकांत धनवडे, गणपत शिंदे, दिलीप फडतरे, धनाजी शेडगे, बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष जालिंदर महाडिक, संचालक अजित साळुंखे, वसंतराव टिळेकर, शिवाजी सावंत, गणपत मोहिते, राजेंद्र मोहिते, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे, विजय पोतेकर, युनियन अध्यक्ष कृष्णा धनवे यांच्यासह सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.