सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परफेक्शनिस्टपणा पुन्हा एकदा दिसून आला. कराड येथील शासकीय विश्रामगृहातील अस्वच्छतेमुळे अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलच झापलं. एवढंच नाही तर अस्वच्छता दिसल्यास माझ्याशी गाठ असे म्हणत चांगलेच धारेवर धरता अधिकाऱ्यांची पाचावर धारण धरली. अन् अजित पवारांची गाडी पुढे जाती न जातीच तो अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव झाली.
कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी पार पडत आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराड येथे रविवारी सायंकाळी दाखल झाले होते. त्यांनी रात्री सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरी स्नेहभोजन केले. त्यानंतर कराड येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला. आज सोमवारी दि. 16 रोजी कोयनानगरला रवाना झाले. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहाची अजित पवार यांनी पाहणी केली.
अजित पवार यांनी पाहणी केल्यानंतर गाडी बसताना बांधकामच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शासकीय विश्रामगृहाची स्वच्छता झाल्याची मला जर नाही दिसली तर माझ्याशी गाठ असे अधिकाऱ्यांला सांगितले. यावेळी अजित पवार यांच्या गाडीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील होते.
You must be logged in to post a comment.