वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सर्वसामान्य शेतकर्यांच्या मालकीच्या असलेल्या सहकारी संस्थांमध्ये चुकीचे काम करणार्यांवर तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पहाता सहकार मंत्र्यांनी कारवाई करावी. जनतेनेही सहकारी संस्था चांगल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात द्याव्यात. किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या पक्ष्याच्या ताब्यातील कारखान्यांचे गैरप्रकार बाहेर काढावेत, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ते वाई येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ना. रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील व मान्यवर उपस्थित होते.
ना. पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्षात गेले की भ्रष्टाचारी आपोआप स्वच्छ होतात. मात्र दुसर्या पक्षातील लोकांच्या चौकशा लावल्या जातात हे राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे.
You must be logged in to post a comment.