सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा आकाशवाणी कार्यक्रमात जिल्ह्यातील लोककलावंतांना सहभागी करून त्यांना संधी द्यावी, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्य संपदेवर कार्यक्रमाचे प्रसारण करावे, अशी मागणी प्रबुध्द रंगभूमीच्यावतीने आकाशवाणी केंद्रप्रमुखांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू असताना आकाशवाणी केंद्राला या विसर पडला आहे. तसेच आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक लोककलावंतांना न्याय मिळाला आहे.
यावेळी प्रबुध्द रंगभूमीचे अध्यक्ष अमर गायकवाड, महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर प्रकाश फरांदे, भारतीय रक्षक आघाडीचे अध्यक्ष वैभव शिंदे, क्रांती थिएटर्सचे सचिव शशिकांत गाडे, भगवान अवघडे व कलावंत उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.