अलंक्रिता कांबळे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधनी अकॅडमीची खेळाडू आणि अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालय साताराची विद्यार्थीनी अलंक्रिता विजय कांबळे हिने शालेय धनुर्विद्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. रौप्य पदक मिळवलेल्या अलंक्रिता कांबळे हिची उस्मानाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अलंक्रिता हि पोलीस कर्मचारी विजय कांबळे यांची कन्या असून तिने यापूर्वी महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक कांस्य पदक आणि सांघिक रौप्य पदक अशी दोन पदके पटकावली आहेत. अलंक्रिता हिला प्रशिक्षक प्रवीण सावंत, शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या यशाबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, वेल्फेअर पीआय शिंगाडे, स्पोर्ट इन्चार्ज गोळे, ग्राउंड इन्चार्ज जाधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!