समाजातील सर्व घटकांनी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी : विनय गौडा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :जिल्ह्यातील शाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे एकंदरीतच बालकांचे; त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन करून विशेष काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले आहे.

ही जबाबदारी केवळ शाळांची नसून शासन आदेशानुसार समाजातील सर्वच घटकांनी याबाबत पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे आपण कोरोनावर विविध पातळ्यांवर प्रयत्न करून मात करीत आहोत. साबणाने वारंवार हात स्वच्छ करणे शारीरिक अंतर पाळणे बाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे शाळांमध्ये सर्व व्यवस्था करणे विद्यार्थ्यांपासून काही विशिष्ट घटकांनी दूर राहणे उदाहरणार्थ वयोवृद्ध, गरोदर महिला कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, औषध उपचार सुरू असलेले इत्यादी घटकांनी हे पालन करावयाचे आहे.

बालकांचे संरक्षण खूप महत्त्वाचे असून तेच भारताचे भवितव्य आहे. प्रशासनाला समाज तसेच प्रसारमाध्यमांचीही उत्तम साथ मिळत आहे.बालकांचे आरोग्य जपावे. त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात त्यांचे प्रबोधन करावे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर बाळगणे, गर्दी न करणे, घराबाहेर खेळायला सोडल्यावर विशेष काळजी घेण्याबाबत सूचना देणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, वारंवार हात स्वच्छपणे कमीत कमी वीस सेकंदापर्यंत व्यवस्थित हात धुणे इत्यादी बाबी त्यांना आपुलकीने समजून सांगाव्यात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, असे देखील आवाहन करण्यात आले असून स्वच्छता खूप महत्त्वाची आहे .बाहेरील अन्न न खाता घरातील ताजे शिजवलेले पौष्टिक अन्न बालकांना द्यावे. स्वच्छता शारीरिक अंतर अशा सवयी बालकांना लावणे गरजेचे आहे. त्यांच्या मनातून कोरोनाची भीती दूर करावी. दुसऱ्या लाटेत जी बालके कोरोनामधून मुक्त झाली आहेत अशा बालकांचे उदाहरण त्यांना द्यावे .आसपास अशी बालके असतील तर त्यांची भेट घडवून द्यावी म्हणजे इतर बालकांचे मनोधैर्य वाढेल ,बालकांचे मनोविश्व तसेच; त्यांच्या सवयी, त्यांच्या भावना लक्षात घेऊनच त्यांचे प्रबोधन करावे लागेल आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल असे विशेषत्वाने नमूद करून घरातील वातावरण शांत आणि तणावमुक्त ठेवावे असे देखील आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे. आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, इत्यादी विभागांसह महसूल खाते आणि पोलीस कोरोनावर मात करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांना जनतेची साथ लाभत आहे. ग्रामसुरक्षा समित्यांना नागरिकांनी बळ द्यावे आणि बालकांचे प्रबोधन ग्रामीण भागात करण्यात ग्रामसुरक्षा समित्यांनी विशेष भूमिका वठवावी, असे श्री गौडा यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!