सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या बुलेट एंट्रीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, उदयनराजेंच्या या बुलेट एंट्रीवर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका केली आहे. तर खा. उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले
.
.
खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या अनोख्या स्टाईलासाठी ओळखले जातात. नुकताच साताऱ्यात ‘चला हवा येऊ द्या’ चा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या मंचावर उदयनराजेंनी थेट 50 फुटांवरून बाईकवर एन्ट्री केली होती. याच मुद्यावरुन शिवेंद्रराजे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,उदयनराजेंची सर्वच कामे ही हवेत असतात, त्यांची एन्ट्री म्हणजे वाऱ्यावरची वरात’ अशा शब्दात शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर ही टीका केली.
शिवेंद्रराजे म्हणाले, आमच्याकडून शेवटच्या सहा महिन्यात कामे दाखवायची असे कधी होणार नाही. उदयनराजे यांची मोटारसायकल वाऱ्यावरुन आली आणि खाली उतरली. त्यांचे कामच वाऱ्यावरचे आहे. जमिनीला धरुन त्यांचे काहीच नसते. सगळं वरुनच त्यांचे चालू असते. स्वत: च्या कामाप्रमाणेच हवेतून मोटारसायकल आली असे शिवेंद्रराजे म्हणाले. आपल्याला तर काय हवेतील जमणार नाही, आपलं रस्त्यावर असलेलं बरं असा टोमणा शिवेंद्रराजे यांनी मारला.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या टिकेला खासदार उदयनराजे यांनी देखील उत्तर दिले आहे. माझी उंचीच तेवढी आहे. शिवेंद्रराजे माझ्या उंचीपर्यंत येऊच शकत नाहीत, सर्वांचा स्वभाव सारखा नसतो, हाताची बोटे सारखी नसतात. कोणाचा स्वभाव प्रेमळ असतो, काहींना टिका केल्याशिवाय झोप येत नाही. त्यांना दोष देणार नाही माझी उंचीच तेवढी आहे. माझ्यावर टिका करण्यापेक्षा माझ्या उंचीपर्यंत त्यांनी पोहोचावे. असे उदयनराजे म्हणाले. टिका केली तर तुम्हाला पोट सुटेल असेही उदयनराजे म्हणाले.
You must be logged in to post a comment.