अंबवडेत “अमर रहे अमर रहे”च्या घोषणा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – अंबवडे सं. वाघोली ता. कोरेगाव येथील जवान दत्तात्रय बाळकृष्ण सकुंडे (वय 35) यांना देहरादून येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आले. बुधवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान सकुंडे यांची पार्थिव बुधवारी दुपारी बारा वाजता देहरादून येथून पुणे येथे आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव अंबवडे येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव सायंकाळी सात वाजता त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी घरातील तसेच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. त्यानंतर जवान सकुंडे यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली तुन शहीद रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी “भारत माता की जय”  “अमर रहे अमर रहे” अशा घोषणा देण्यात आल्या.

सातारा पोलीस दलातर्फे शहीद जवान सकुंडे यांना बंदुकीच्या फैऱ्यांनी मानवंदना देण्यात आली. तसेच बुधवारी सकाळपासून गावातील सर्व व्यवहार व्यापाऱ्यांनी बंद ठेवून जवानाला श्रद्धांजली वाहिली शहीद जवान सकुंडे यांच्या पार्थिवाला त्यांच्या भावाने मुखाग्नि दिली. सकुंडे यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी ‘भाऊ व अकरा वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

error: Content is protected !!