सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जुलै महिन्यात सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूस्खलन तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. महाबळेश्वर प्रतापगड प्रतापगड रस्त्या दरम्यान असलेला आंबेनळी घाटातील रस्ता खचला होता. त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ४८ दिवसांनंतर रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
You must be logged in to post a comment.