सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जसं पुस्तकांचे गाव म्हणून भिलार गावाची ओळख आहे. मिल्ट्री मॅनच मिलिटरी आपशिंग तसं भविष्यात किल्ल्यांचं गाव म्हणून अंबवडे बुद्रुक जगाच्या नकाशावर ताट माणाने उभा राहिलेलं दिसेल आणि फक्त दिवाळी पुरतच किल्ले न करतात 365 दिवस 24 तास लोकांना किल्ले बघता यावीत अशी ही इच्छा शिवसेना उपनेते नितीन बानगुडे – पाटील यांनी व्यक्त केली.
मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या शिवविचार रुजविण्यासाठी गेली 10 वर्षे सातारा तालुक्यातील अंबवडे बु गावात किल्ले स्पर्धा घेतली जात आहे.
दिवाळी म्हटलं की रांगोळी आकाशकंदील फटाके फराळ अशा सर्व गोष्टींबरोबर घराच्या आवारात किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचा जुन्या परंपरेकडे सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात दुर्लक्ष झाले आहे मात्र सातारा तालुक्यातील आंबवडे बुद्रुक गावात मावळ्यांनी या वर्षी जवळपास 50 किल्ल्यांच्या प्रतिकृती उभ्या केल्या होत्या त्याही एक गुंठा दोन गुंठे एवढ्या मोठ्या आकाराचे होते यामध्ये दातेगड शिवनेरी तिकोना चाललेत पन्हाळा पुरंदर प्रतापगड राजगड सिंधुदुर्ग देवगिरी विशाळगड सिंहगड यासारखे अनेक किल्ले मुलांनी हुबेहूब बनवले होते यामुळे गावाला ऐन दिवाळीत यात्रेचे स्वरूप प्राप्त झालं होतं या किल्ल्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
You must be logged in to post a comment.