सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सामाजिक कार्यात ठसा उमठविणारे अमोल इंगोले यांची सातारा शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.रविवार दि.8 रोजी सातारा येथील शिवसेना पक्षीय कार्यक्रम मध्ये पक्षाचे सातारा सांगली संपर्क प्रमुख ना.नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
भविष्यात सातारा नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूकीच्या दृष्टीकोनातून शिवसेना सातारा शहर संघटन बांधणी केली जात आहे. शहरातील अनेक कार्यकर्ते सध्या पक्षाच्या संपर्कात असून संघटनेत महत्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत.
सातारा नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून शहरात पक्ष सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमोल इंगोले यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते,
शहरप्रमुख निलेश मोरे,बाळासाहेब शिंदे उपशहरप्रमुख अभिजित सपकाळ,गणेश अहिवले,विभागप्रमुख अमोल खुडे,प्रथमेश बाबर यांच्या सह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.