ओझर्डे येथील जवान शहिद

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना वाई तालुक्यातील ओझर्डे येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८) शहीद झाले. त्यामुळे परिसरात शोककला पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमनाथ तांगडे हे मिल्ट्री मधील सिग्नल या डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर काम करीत होते. ते सिक्कीम येथील कॉलिंग पॉंग येथील १० किलो मिटर वर बर्फाच्या टेकडीवर इतर दोघांबरोबर नेमणूकीस होते. पण दिनांक ८ रोजी  बर्फाच्या डोंगराळ भागाला वादळी वारा व पावसाने रात्री ३ वाजण्याच्या सुमारास झोडपून काढले. त्यात त्यांचे तंबू उडुन गेले. त्यामुळे रात्रभर हे तिघेही भिषण थंडीत कुडकुडत बसले. त्या वेळी जवान सोमनाथ अरविंद तांगडे हे चक्कर येऊन  तेथील बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते.

त्यांना उपचारासाठी कॉलींग पॉंग येथील बॅरेकपुर येथील मिलिट्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते . तेथे त्यांच्या वर शस्त्रक्रिया केली गेली पण तेव्हा पासून ते कोमात गेले व आज दि १६ रोजी त्यांचा उपचारा दरम्यानच सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे.  त्यांचे शव सिक्कीम वरुन विमानाने पुण्यापर्यंत आणण्यासाठी ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी श्रीमती रेश्मा, मुलगी सिद्धी, वय १२ वर्ष, परी वय ८ वर्ष असे आहेत.  शहीद सोमनाथ यांचे पार्थीव लवकर मिळण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या आकस्मित जाण्याने ओझर्डे गावासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!