ओढ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अंगापूर, ता. सातारा येथील वृद्धेचा बुधवारी दुपारी ओढ्याच्या पाण्यात बडुन मृत्यू झाला. बबई लक्ष्मण कणसे (वय ७४, रा. अंगापूर, ता. सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत भरत लक्ष्मण कणसे (रा. अंगापूर) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. हवालदार शिंदे हे अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!