आनंदाचा शिधा सप्टेंबरमध्ये वितरीत होणार : जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्यादेय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना आगामी गौरी-गणपती उत्सव व तद्नंतर दिवाळी सणानिमित्त चार शिधा जिन्नस असलेला अनंदाचा शिधा १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.

प्रति शिधापत्रिका १ संच ज्यामध्ये १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल असे एकूण ४ जिन्नस असलेला १ संच १०० रूपये या दराने रास्तभाव दूकानातून वितरीत करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये ३ लाख ६२ हजार ४२ प्राधान्य कुटुंब लाभार्थी व २६ हजार ८६५ अंत्योदय कुटुंब लाभार्थी अशा एकूण ३ लाख ८८ हजार ९०७ पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी केले आहे.

error: Content is protected !!