आनेवाडी टोलनाका कर्मचाऱ्यास टोळक्याकडून मारहाण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा-पुणे महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर काल, रात्री सुमारास टोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका टोळीकडून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली.

विनायक नामदेव तनपुरे व सीमा विनायक तनपुरे रा.भोर, जिल्हा पुणे हे दांपत्य रविवारी रात्री 10 वाजता टोल नाक्यावरून पुण्याकडे जात होते.  आनेवाडी टोलनाक्यावर रात्री बूथ क्रमांक एकसमोर कार टोल घेण्यासाठी थांबवली असता. त्यावेळी कर्मचारी रोहित राजेश सोनवणे, रा.विरमाडे, ता. वाई याची वाहन चालक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर तनपुरे दांपत्याचे लिंब, ता सातारा येथील शुभम अंबर सावंत, सनी सावंत, निलेश सावंत रा.लिंब व आकाश रोकडे रा. मर्ढे या नातेवाईकाना याबाबत माहिती दिली.  या सर्व तरुणांनी नाक्यावर येवून शिविगाळ केली. यावेळी प्रतिउत्तर देताना कर्माचारी व या टोळक्यांमध्ये जोरदार धुमचक्री झाली.

सुमारे अर्धा तास याठिकाणी हा गोंधळ चालू होता.  यावेळी टोल कर्मचारी यानी देखील शिविगाळ केली. या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सपोनि. आशिष कांबळे करीत आहेत. चालकाने टोल कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर कर्मचारी आणि कारमधील प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. कारमधील प्रवासी महिलेशी उध्दटपणे बोलत असल्याच्या कारणावरून कारच्या पाठीमागून आलेल्या दुसऱ्या कारमधील पाच ते सहा जणांनी टोल नाका कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

error: Content is protected !!