सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा महाराष्ट्र अंनिसच्या २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक ऑनलाईन नुकतीच पार पडली. यामध्ये सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून तारळे गावाचे माजी मुख्याध्यापक विलासराव भांदिर्गे, तारळे,ता.पाटण यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून तर , जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून वंदना माने, सातारा , व जिल्हा प्रधान सचिव म्हणून ॲड. हौसेराव धुमाळ, सातारा यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी राज्य निरीक्षक म्हणून अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार व हमीद दाभोलकर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यातील कामाच्या वाढीच्या दृष्टीने अंनिसच्या विविध विभागांच्या समित्यांवर पुढीलप्रमाणे एकमताने निवड करण्यात आली. बुवाबाजी संघर्ष विभाग- सीताराम चाळके -कऱ्हाड, मोहसीन शेख-रहिमतपूर , वार्तापत्र व प्रकाशन विभाग – प्रकाश खटावकर –सातारा , शिवाजी शिंदे- रहिमतपूर, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग – सुभाष कळसे- वाई, महिला विभाग – अंकिता पवार –पिंपरी-रहिमतपूर, सातारा, विविध उपक्रम- विकास तोडकर –सातारा, जात निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड विभाग – तानाजी इंगळे-औंध, प्रमोद भिसे –वाई , मानसिक आरोग्य विभाग – राजेंद्र पवार –सातारा, युवा व विवेक वाहिनी विभाग – प्रशांत जाधव- औंध, सोशल मिडीया विभाग – हेमंत जाधव – कोरेगाव , रणवीर गायकवाड –वाई, प्रशिक्षण विभाग – सी.आर.बर्गे-कोरेगाव, कायदा विभाग – ॲड. मिलिंद पवार- सातारा, सांस्कृतिक विभाग –विजय पवार –सातारा
You must be logged in to post a comment.