अण्णा नाईकांनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट!

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील अण्णा नाईक फेम अभिनेते माधव अभ्यंकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथील जलमंदिर पॅलेस या ठिकाणी सदिच्छा भेट घेतली.

खासदार उदयनराजे हे “रात्रीस खेळ चाले” या मालिकेतील अण्णा नाईक यांच्या डायलॉगचे चाहते आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या मुलाखतीत “अण्णा नाईक असो” हा डायलॉग बोलून दाखवला आहे. यावेळी माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाचे आणि त्या डायलॉग म्हणत तोंड भरून कौतुक केलंय.

या भूमिकेबाबत महाराष्ट्रातून खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या असल्याचे सांगत महाराजांनाही ‘अण्णा नाईक असो’ हा डायलॉग आवडतो हे ऐकून धन्य झालो असून, माझी पत्नी देखील उदयनराजे भोसले यांची चाहती आहे लवकरच आम्ही एकत्र महाराजांची भेट घेणार असल्याचे अभिनेते माधव अभ्यंकर म्हणाले.

यावेळी आपला आनंद व्यक्त करताना अभिनेते माधव अभ्यंकर म्हणाले की, मला केव्हापासून महाराजांना भेटण्याची इच्छा होती. पण योग येत नव्हता. आज अचानक मित्रवर्य मेघराज राजेंची भेट झाली आणि ते म्हणाले की चला महाराजांना भेटायला जाऊ. मी म्हणालो देखील की, नको तिथे गर्दी असेल, आपण नंतर जाऊ. पण त्यांनी हट्ट केला आणि आमची भेट झाली.

error: Content is protected !!