लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याची रिपाइंची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती बसवण्यात यावा, अशी मागणी रिपाइं मातंग आघाडीच्यावतीने निवेदनाद्वारे सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना करण्यात आली आहे.

रिपाइंच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहरात सध्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. हा पुतळा अनेक वर्षांपूर्वी बसवल्याने या पुतळ्याला छोटे-छोटे छिद्र पडले आहे. या ठिकाणी देखभाल दुरुस्ती करण्याची व्यवस्था नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तरी नगरपालिकेच्यावतीने पुर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी तरतुद करण्यात यावी. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देताना रिपाइं मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे, जिल्हासहसचिव सागर फाळके, शहराध्यक्ष मधुकर घाडगे, शहर उपाध्यक्ष प्रणव मुळे, प्रसिद्धी प्रमुख जगनाथ खवळे, शेखर वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!