सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पगार, सातवे वेतन आयोगाचा फरक यांचे बिल काढण्यासाठी वाई येथील कोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकाऱ्याला १ हजार रुपयांची लाच घेतना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
सुधाकर शंकर कुमावत (४१), उपकोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय वाई,जि-सातारा वर्ग -2मुळ राहणार -फ्लॅट नंबर- बी-201, विलास सोसायटी, ससाणे नगर,हडपसर, पुणेसध्या राहणार -गीतांजली हॉस्पिटल जवळ, वाई असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे तीन महिन्याचा पगार वीस वर्षाचा लाभ सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण 2,77,685/- रुपयांचे बिल परीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढल्याचे कामाकरिता 2,000/-रुपये लाचेची मागणी उपकोषागार अधिकारी सुधाकर कुमावत याने केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदाराने लाप्रविचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत यांनी पडताळणी केली.त्यानंतर आज सचिन राऊत यांच्यासह पोलीस अंमलदार विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले यांनी सापळा रचला. यावेळी उपकोषागार आधिकारी कुमावत याने तक्रारदार कडून एक हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
You must be logged in to post a comment.