कराडचा वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वखारीवर कारवाई न करण्यासाठी चोरे, ता. कराड येथील वनरक्षक राहुल बजरंग रणदिवे (वय २४, रा. गोडोली, सातारा) यास १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांची लाकडाची वखार असून त्यांच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक राहुल रणदिवे याने २५ हजारांची लाच मागितली. चर्चेअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केल्यानंतर रणदिवे याला 15 हजाराची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के,पोलीस निरीक्षक अविनाश जगताप,पोलीस नाईक ताटे, पोलीस कॉन्स्टेबल खरात, येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!