सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : शेती पंपासाठी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना प्रकरणी वाठार, ता.कराड येथील महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. राहुल अशोक सोनवले, (वय -३८) रा. हजारमाची, कराड असे अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचे शेती पंपासाठी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी कनिष्ठ अभियंता राहुल सोनवले याने ५ हजारांची लाचेची मागणी केली. ती बुधवारी स्वीकारली. यावेळी लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले. या कारवाईत पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो.ना ताटे, पो.कॉ. येवले यांनी सहभाग घेतला.
You must be logged in to post a comment.