सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मागासवर्गीय लाभार्थ्याला जिल्हा परिषदेच्या सेस फंडाच्या योजनेअंतर्गत उसाचे रस यंत्र खरेदी करण्यास मिळालेल्या पैशाच्या मोबदल्यात आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना खटाव पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक रविकांत नारायण लोहार (वय 46) याला रंगेहात पकडले.
यातील तक्रारदार हा मागासवर्गीय लाभार्थी असून त्यांना जिल्हा परिषद मधील (20% मधून वस्तु खरेदी करण्यासाठी मदत पुरवणे )या योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजुरीला पाठवला होता. त्या नुसार तक्रारदारास उसाचे रस यंत्र खरेदी करण्यास मिळालेल्या पैशाच्या मोबदल्यात पडताळणी मध्ये 8500/- रु.ची लाचमागणी करून तडजोडीअंती 8000/- रु घेतांना रंगेहात पकडले आहे.
या सापळा कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला
पो.ह. शिंदे, पो.काॅ काटकर, भोसले यांनी सहभाग घेतला.