सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): गुटख्याची दाखल असलेल्या केसमधून जामिनावर सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद श्रीरंग पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाची कोरेगाव पोलीस ठाण्यात गुटख्याप्रकरणी केस दाखल आहे. या केसमध्ये मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे यांनी २० हजार रुपयांची मागणी केली. तशी तक्रार लाचलुचपत विभागाकडे आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आरीफा मुल्ला, अविनाश जगताप
पो ना राजे, ताटे, खरात यांच्या पथकाने कारवाई करुन पाटोळे यांना लाच घेताना रंगेहात पकडले.
You must be logged in to post a comment.