भाजप जिल्हाध्यक्षपदी जयकुमार गोरे यांची नियुक्ती

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) :भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आ.जयकुमार गोरे यांची नियुक्ती केली. यावेळी सरचिटणीस श्रीकांत भारती, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर व पदाधिकारी उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, भाजपा पार्टीच्या सातारा जिल्ह्यातील वाढीसाठी नक्कीच प्रयत्नशील राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार्टी ताकदीने वाढवू असा विश्वास व्यक्त करत आहे.

error: Content is protected !!