सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सरकारने मागासवर्गीयांना पदोन्रतील ३३ टक्के जात
समूहाचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला असून दि. ७ मे रोजी याबाबतचा निर्णय काढून मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे. मागासवर्गीयांना त्यांच्या हक्काचे पदोन्नोतील आरक्षण मिळालेच पाहिजे. यासह अन्य मागण्यांसाठी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, राज्य सरकारने मागास प्रवर्ग या ३३ टक्के जात समूहाचे आरक्षण संपवण्याचा निर्णय घेतला असून तो निर्णय तत्काळ मागे घ्यावा, हा निर्णय मंत्रालयातून काढणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताबडतोब हटवून मागासवर्गीय मंत्र्याची नेमणूक करावी. देशातील कामगार हिताचे ४ नवीन कायदे रद्द करण्यात यावेत, प्रदेश शिष्यवृत्तीसाठी लावण्यात आलेल्या घटनाबाह्य उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही
कोणाच्या बापाचे, मागासवर्गीय एकजुटीचा विजय असो, ७ मे चा शासन निर्णय रद्द करा, संविधानिक हक्काची पायमल्ली थांबलीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सरवदे, कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे अजित वाघमारे, सहसचिव भागवत करडे, ऑल इंडिया आदीवासी एम्प्लॉएज
फेडरेशनचे प्रकाश चवरे, सिद्धार्थ खरात, त्रिंबक आढाव, सुशांत गायकवाड उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.