सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये एका जवानाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जवानाने आदर्की फाटा परिसरात मुलीला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये सोमवारी एक कुटुंब दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. ते एस ७ या डाब्यात सर्व जण बसले होते. रात्री सर्वांची झोप झाल्यानंतर त्या कुटुंबातील ८ वर्षीय मुलीला डब्बामध्ये प्रवास करणाऱ्या एका जवानाने (झांशी युनिट) तिला बाथरुममध्ये उचलून नेहले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात प्रयत्न केला. तिला झोपेतून जाग आलेल्याने ती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करु लागल्यानंतर त्या जवानाने तिला धावत्या रेल्वेतून खाली फेकले.
आदर्की फाटा परिसरात अल्पवयीन मुलगी रुळावर पडल्याने ती जखमी झाली. तिच्या मदतीला गावातील लोक धावून आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी एक्सप्रेस थांबवून रेल्वेची तपासणी केली. तेव्हा संशयीत जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
You must be logged in to post a comment.