सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :पंतप्रधान यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्या नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी तक्रार भाजपने यांनी सातारा पोलीस स्टेशनला केली आहे.
भाजपच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले पंजाब राज्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीत घडलेल्या घटनेचा व नाना पटोले यांनी “मी मोदींना मारू शकतो” या केलेल्या विधानाचा काही संबंध आहे का? याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने केलीच पाहिजे. महाभकास आघाडी सरकारने याविरोधात नाना पटोले वर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या नंतर मात्र त्यांना अर्धा तासाच्या आत अटक करण्यात आली. त्यामुळे या राज्यात सत्ताधारीनी काहीही केलं तरी त्यांना वेगळ्या न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय अशा प्रकारची हुकूमशाही या राज्यात सुरू आहे अशी टीका भाजपच्या वतीने ठाकरे सरकारवर केली.
यावेळी भाजप चे जिल्हा सरचिणीसपद विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ सचिन साळुंखे, भटके विमुक्त महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रिया नाईक, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, शहर चिटणीस रवी आपटे, उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, युवा मोर्च्या शहराध्यक्ष विक्रम बोराटे, ओ बी सी मोर्च्याचे अविनाश क्षीरसागर, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.