भारत टॅलेंट सर्च परीक्षेत आर्यन वाघमारे राज्यात पंधरावा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक शाळेतील चौथीचा विद्यार्थी कु.आर्यन अनिल वाघमारे याने भारत टॅलेंट सर्च परीक्षेत १५० पैकी ११४ गुणांसह राज्यात १५ वा येण्याचा बहुमान मिळविला आहे.

तसेच या परीक्षेत या शाळेतील प्रज्ञेश गोखले,असद शेख,राज वायदंडे,वीर धडचिरे, वेदिका पवार, प्राजक्ता कांबळे तसेच इतर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवून यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!