सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अमुल्य वाटा उचलला आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी आशा स्वयंसेवकांनी राज्यभऱात एकदिवसीय संप पुकारला.
आशा स्वयंसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. सध्या आशा स्वयंसेविका राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन, कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात अमुल्य वाटा उचलला आहे. त्यामुळे आशा स्वयंसेवकांना किमान वेतन मिळावे. कोवीड लसीकरणासाठी विशेष तरतूद करावी. कोवीड सुरक्षा साहित्य व विमा सरंक्षण मिळावे, या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला आहे.
You must be logged in to post a comment.