मांढरदेव घाटात ट्रक पलटी, एक ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई – भोर रस्त्यावर मांढरदेव घाटात कोचाळेवाडी, ता. वाई हद्दीत गुरुवार दुपारी दोन वाजता भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशीक बुधवारी भोर तालुक्यात येथे बोर काढण्यासाठी पिंपरी (रहिमतपूर ) ता, कोरेगांव येथील बोरवेल मशीन व एक मालाने भरलेला ट्रक (एम एच १२- एम ३५७१) अशी दोन वाहने गेलेली होती. बोर काढून दुपारी दोनच्या दरम्यान माढरदेव घाटातून वाईकडे येत असताना ट्रक चालकांचा गाडीवरील ताबा सुटून मांढरदेव घाटात विरुध्द दिशेला डोंगराच्या साईडला धडकला व पलटी झाला. या ट्रकमध्ये चार कामगार बसले होते, यामध्ये उदय नारायण सिंह वय २१ वर्षे, झगलू सुकणतिया धनुहार वय १९ वर्षे रा. सर्वजण मध्यप्रदेश, ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे, त्यातील कामगार गंगाप्रसाद दशरथ यादव वय २१ वर्षे रा, मध्यप्रदेश हा गंभीर जखमी झाल्याने त्याला सातारच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रक चालक संताजी दत्तू साळुंखे रा.पिंपरी (रहिमतपूर )याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडीसह ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे, वाई पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

error: Content is protected !!