सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावरील नागठाणे, ता. सातारा येथील एटीएम मशीनमध्ये जिलेटीन कांड्यांचा वापर करून फोडल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नागठाणे येथील बॅंक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये मंगळवारी मध्यरात्री एक चोरटा शिरला. एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला. त्यानंतर मशीनच्या खाली जिलेटीन कांड्या लावल्या. स्फोट घडवून एटीएम मशीन फोडले. दरम्यान, या एटीएममध्ये किती रक्कम चोरली याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. दरम्यान, स्फोट झाल्याने परिसरात आवाज झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. चार चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये स्फोट केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात कराड येथे देखील अशा पध्दतीने एटीएम फोडून रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
You must be logged in to post a comment.