सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. सातारा शहरातील एका उपनगरात एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील काकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नराधम काकाने दिली होती. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून फरार आरोपी काकाचाही कसून शोध घेत आहेत.
You must be logged in to post a comment.