अभियंत्याला मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाहनाचे ऑईल गळत आहे, असे सांगून डोळ्यात चटणी टाकून मोबाईल हिसकावून घेऊन कनिष्ठ अभियंत्याला अज्ञातांनी एक वर्षांपूर्वी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी 3 संशयितांना औंध पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे तब्बल एक वर्षानंतर अटक केली आहे. दिलीप महादेव माळी असे कनिष्ठ अभियंत्यांचे नाव असून यामध्ये त्यांच्या पत्नीचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशयितांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोपूज कारखान्याजवळ असलेल्या पेट्रोलपंपा नजीक 28 जुलै 2021 रोजी ही घटना घडली होती. औंध पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून यातील संशयित असलेले फिर्यादीची पत्नी साधना दिलीप माळी, अमित चंद्रकांत बोलके, सागर शंकर भोळे यांना अटक केली आहे. दरम्यान, फिर्यादी हे वडूज पंचायत समिती येथे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस होते.

दीपक आणि त्यांचा भाचा अथर्व अनिल माळी हे कार्यालयातून सकाळी सातच्या सुमारास कराडला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी गाडीतून ऑइल गळते, असे म्हणत दिलीप माळी यांच्या डोळ्यात चटणी टाकली व सुमारे 20 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेऊन संशयितांनी त्यांना मारहाण करत त्यांचा पाय फ्रॅक्चर केला होता. ही बाब अथर्वने घरच्यांना कळवली होती. ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे.

मोबाईल लोकेशनवरून संशयित आरोपी अमित चंद्रकांत बोलके यास पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले. त्याने दिलीप माळी यांची पत्नी साधना माळी हिने आणि सागर शंकर भोळे यास दिलीप माळी यांना मारहाण करण्याची सुपारी दिली होती, अशी माहिती ऑल पोलिसांना दिली आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करत आहेत.

error: Content is protected !!