सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक पंचवार्षिक निवडणूकीत अत्यंत चुरशीच्या अशा कराड तालुका सोसायटी गटातील सहकार पॅनेलचे उमेदवार राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाळासाहेब पाटील यांना भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या गटाने पाठिंबा दिला आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकार मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नामदार बाळासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते, जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. दोन्ही गटांनी सहलीवर पाठवलेले मतदार रात्री उशिरा कराडमध्ये दाखल झाले. त्यानंतर सकाळी मतदानाला सुरुवात होताच दोन्ही गटाच्या मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
दरम्यान भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत त्यांच्या समर्थक मतदारांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना उघडपणे पाठिंबा दिला. बाळासाहेब पाटील यांच्या विजयासाठी विजयासाठी मतदारांशी सुसंवाद साधला.यावेळी मेळाव्यात त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले व ते निश्चितच अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास अतुल भोसले यांनीयावेळी व्यक्त केला
You must be logged in to post a comment.