सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंधच्या श्रीयमाईदेवी व कराडदेवीच्या नवरात्रोत्सवास अतिशय साधेपणाने देवतांचे विधीवत पूजन करून उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
औंध येथील मूळपीठ व यमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते कराडदेवीचे पूजन करून देवीची मखरात प्रतिष्ठापना येथील राजवाडयात करण्यात आली.त्याअगोदर देवस्थानचे पौरोहित्य गणेशशास्त्री इंगळे, वसंतराव देशपांडे, प्रविण इंगळे ,चैतन्य इंगळे
यांनी पौरोहित्य पठन केले .त्याचबरोबर गुरुवारी पहाटे येथील मूळपीठ डोंगरावरील मूळनिवासिनी मंदिरात देवीचा महाभिषेक करण्यात आला . साडी चोळीची ओटी भरण्यात आली.त्यानंतर कराडदेवी येथे पुण्यहवाचन, मातूकापूजन,,नांदी श्राध्द, ब्राम्हणांना वरणी देवक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रपुष्पांजली, मंत्रपठण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
कोरोनाचे नियम पाळत हे सर्व विधी पार पाडण्यात आले.यावेळी शंकरराव खैरमोडे, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, सपोनि प्रशांत बधे,आब्बास आतार, गणेश देशमुख, उमेश थोरात, दिपक कदम, श्रीपाद सुतार ,ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान नवरात्रोत्सवनिमित्त दुर्गा ज्योती नेण्यासाठी सातारा, सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील दुर्गा मंडळांची बुधवारी रात्री उशीरापासून मूळपीठ डोंगर, ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी मंदिरात वर्दळ दिसून येत होती.
You must be logged in to post a comment.