सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : वारंवार नोटिसा बजावूनही रेल्वे विभागानं भाडेपट्ट्याचं नूतनीकरण न केल्यानं वन विभागाकडून मध्य रेल्वेच्या महाबळेश्वर येथील हॉलीडे होमला टाळे ठोकले. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली पाच एकर मिळकत वन विभागानं ताब्यात घेतली आहे.
वन विभागानं वेण्णा लेकच्या मागील बाजूच्या क्षेत्रातील महाबळेश्वर रस्त्यावर फॉरेस्ट सर्व्हे नंबर २२३ मधील पाच एकर जागा १९७८ मध्ये मध्य रेल्वेला दहा वर्षांसाठी भाडेपट्टा करारानं दिली होती. या जागेत मध्य रेल्वेनं आपले हॉलीडे होम बांधले. त्यावेळी केलेल्या कराराची मुदत संपुष्टात येताच वन विभागानं नोटिसा पाठवून कराराचं नूतनीकरण करण्याबाबत मध्य रेल्वेला सूचित केलं. तसंच नूतनीकरण न केल्यानं कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागानं दिला होता. तरी देखील मध्य रेल्वेनं याकडे दुर्लक्ष केलं. अखेर सातारा उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी केलेल्या सूचनेनुसार सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांनी मध्य रेल्वेवर कारवाई करण्याचे आदेश दिले
You must be logged in to post a comment.