सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी व इतर कडक निर्बंध लागू केले होते. तरीही वाई तालुक्यातील बावधन ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांनी दिलेला आदेश झुगारून बगाड मिरवणूक काढल्याने १०६ लोकांची नावे निष्पन्न झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पुन्हा १३ जणांना ताब्यात घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लघंन केल्याने वाई पोलिसांनी शुक्रवार दि. २ रोजी 83 नागरिकांना ताब्यात घेतले होते. शुक्रवारी बगाड मिरवणूक संपताच बगाड्यासह ताब्यात घेतले होते, त्या सर्वांना प्रथक वर्ग न्यायाधीश व्ही एन गिरवलकर यांच्यासमोर उभे केले असता, पाच हजार रुपये वैयक्तिक जामिनावर मुक्त करण्यात आले, तसेच शनिवार दिनांक ३ रोजी आणखी १३ जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित जणांचा शोध चालू होता. दरम्यान सोमवार दि 5 रोजी बगाड मिरवणूक मधील 3 व पालखी मिरवणुकीतील दहा जण असे 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात उभे केले असता प्रत्येकी पाच हजार वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली आहे, नागरिकांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी आदेशाचा भंग करणे, कोरोना संसर्ग प्रसारास कारणीभूत ठरणे, प्राण्यांना निर्दयीपणे वागवणे अशी कलमे लावण्यात आली आहेत.
You must be logged in to post a comment.