खंडणीप्रकरणी डीवायएसपी घनवट आणि हवालदार शिर्के यांचा जामीन अर्ज फेटाळला

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी सातारा न्यायालयात तत्कालीन डीवायएसपी पद्माकर घनवट आणि हवालदार विजय शिर्के यांनी केलेला अर्ज सातारा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.व्ही.बोरा यांनी फेटाळला.

सातारा शहरातील शाहुपूरी येथील गुरुकुल शाळेप्रकरणी खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी तत्कालीन एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि तत्कालिन एएसआय विजय शिर्के यांनी २५ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी न्यायालयातून गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात अटक होवू नये म्हणून त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी पार पडली. त्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. मिलिंद ओक तर चोरगे यांच्यावतीने ॲड. सदाशिव सानप यांनी न्यायाधिश बोहरा यांच्यासमोर बाजू मांडली. तर घनवट व शिर्के यांचे वकील त्यांची बाजू मांडत होते. ॲड.ओक यांनी या प्रकरणात चोरगे यांना गुरुकुल प्रकरणात अडकवण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून ३० लाख रुपयांची मागणी केली. १२ लाख ३० हजार रुपये स्वीकारले होते. चोरगे यांना वेळोवेळी भिती दाखवून त्यांच्याकडून खंडणी वसुल केली होती, असा प्रथमदर्शनी पुरावा दिसतो आहे. तसेच तत्कालीन एएसआय शिर्के यांनी फोनवरुन साधलेला संवाद आहे. त्यात त्यांनी पैसे स्वीकारल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे त्या दोघांनी कायद्यांची भिती दाखवून चोरगे यांच्यांकडून साडेबारा लाख रुपयांच्या खंडणीचा स्वीकार केला आहे. तसेच त्यांच्याकडून एक मोबाईल घेतला आहे. तसेच लोकल क्राईम ब्रँच येथे खुर्च्या खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये घेतले आहेत. या सर्व बाबींचा सबळ पुरावा आहे, खरेदी केलेला मोबाईल हस्तगत करावा, घेतलेले 12 लाख 39 हजार रुपये हस्तगत करावेत. मा न्यायालयातील फाडलेले चार्जशीट, तसेच खुर्च्यां कोणाकडून खरेदी केल्या, बिल कोणाकडे दिले, मोबाईल कोणाला विकला याचे पुरावे जमा करणे गरजेचे आहे म्हणून दोघांचीही पोलीस कोठडी मिळणे गरजेचे आहे. न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी द्यावी. तपासासाठी हे महत्वाचे आहे. घनवट आणि शिर्के या दोघांचा गुह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. गुह्याचा सखोल तपास करण्याकरता पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. वकीलांची बाजू ऐकून घेवून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के व्ही बोरा यांनी डीवायएसपी घनवट आणि हवालदार शिर्के यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

अटक होणार काय?

यापूर्वीची सातारा एलसीबी वादग्रस्त राहिली आहे. एलसीबीचे प्रमुख असलेलेच अधिकारी न्याय मागायला गेलेल्यांची पिळवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. तर खोटया गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवून चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेवून कायद्याची भिती दाखवत खंडणी उकळणाऱ्या डीवायसएपी घनवट, शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!