बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंची भेट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बैलगाडा शर्यत चालू व्हावी यासाठी समस्त सातारा जिल्ह्यामधून बैलगाडा मालक, चालक, शर्यतशौकीन यांच्या उपस्थितीत शर्यत चालू होण्यासाठी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.

न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना बंदी घातली आहे. बैलगाडी शर्यत ही कृषी संस्कृतीचाच एक भाग आहे. शेतकरी वर्गाकडून या बैलांचा मुलांसारखा संभाळ केला जातो. बैलगाडी शर्यतीमुळे मोठी उलाढाल होतहोती. तसेच अनेक ग्रामीण भागातील मनोरंजनाचे साधन आहे. बैलगाडी शर्यत सुरु करण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेची मागणी आहे. त्याचा आदर राखून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यपुर्वक विचार करुन बैलगाडी सुरु करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकावीत, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

error: Content is protected !!