खंबाटकी घाटातील नव्या बोगदा कामाची बाळासाहेब पाटील यांच्याकडून पहाणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याच्या कामाची पहाणी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पुणे विभागीय प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सातारा-पुणे महामार्गावर वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या पुढाकाराने आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे काम जलगतीने सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे-सातारा- कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक या मार्गिका बोगद्यामुळे सुरळीत होणार आहे. हा मार्ग जिल्ह्यातून जाणार असल्यामुळे सातारा जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. सुरक्षतेला प्राधान्य देवून या बोगद्याचे काम सुरु आहे. या बोगद्यामुळे अंतर कमी होण्याबरोबर वेळेची, इंधनाची, पैशाच्या बचतीबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री. पाटील यांनी पहाणी दरम्यान व्यक्त केला.

error: Content is protected !!