सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा ): वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अमंलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
पालकमंत्री पाटील यांनी सातारा शहरातील पोवई नाका, मोती चौक, एस.टी. स्टॅन्ड परिसराची पहाणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट, यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते. शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अमंलबजावणी करा, अशा सूचना पोलीस विभागाला पालकमंत्री पाटील यांनी पाहणी दरम्यान केल्या.
यानंतर पालकमंत्री पाटील यांनी नगर परिषदेच्या पुज्य कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथे सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा संकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. तत्पूर्वी प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपायोजना व रुग्णांवरील उपचारांबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.