बाळासाहेब सानप यांचा शिवसेनेतून भाजपात प्रवेश

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा):  नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सोमवारी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार उपस्थित होते. सानप यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आणखी काही नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

बाळासाहेब सानप भाजपमध्ये कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, पराभवनंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत पक्षाकडून जबाबदारी दिली नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पंचवटी परिसरात त्यांचे चांगले काम असून त्याचा भाजपला फायदा होणार आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले. त्यांना महामंडळ देण्याचे आश्वासन दिले. मात्र, सानप यांनी त्यास नकार दिला. माझे संघ परिवारातील अनेक संस्थांशी संबंध असून त्यांच्यामध्ये काम करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे सानप यांनी सांगितले होते.

दरम्यान, सोमवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी फडणवीस म्हणाले ‘भाजपमध्ये येत्या काळात अनेक जणांचा प्रवेश होणार. काही जण रोज वावड्या उठवतात भाजपचे लोक आमच्याकडे येणार. खरं म्हणजे या वावड्या उठवण्याचे कारण एकमेव आहे. कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. पण त्यांच्या पक्षात इतकी अस्वस्थता आणि नाराजी आहे. की हे आमदार काय करतील ही भीती असल्यामुळं या वावड्या उठवल्या जात आहेत,’ असा दावा केला आहे.

ed

error: Content is protected !!