सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सरकारनं घेतलेल्या वाईन बाबतीतच्या निर्णयाच्या विरोधात साताऱ्यात कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात बंडातात्यांविरोधात एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हजर होण्यासाठी बंडातात्या स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.
बंडातात्या शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याने सातारा शहर, सातारा तालुका पोलिस, आरसीपी पोलिसांची एक तुकडी पाचारण करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिस मुख्यालय रस्ता दुपारी १२.३० वाजता बंद करण्यात आला होता.सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, आज सातारा पोलिस ठाण्यात बंडातात्यांची चौकशी करण्यात आली.
You must be logged in to post a comment.