खटाव (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सुर्याचीवाडी ता.खटाव जि. सातारा येथील तलावात पहिल्यांदाच ‘बार हेडेड गुज’ म्हणजेच (पट्टेरी हंसांचे) आगमन झाल्याने पक्षी मित्रांमध्येये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खटाव तालुक्यातील मायणी व परिसरातील सुमारे ८६६ हेक्टर क्षेत्राह नुकतेच केंद्र शासनाकडून राखीव पक्षी संवर्धन क्षेत्र घोषित केले आहे. या परिसरामध्ये पक्षी अभ्यासकांच्या मते ३५० हून अधिक विविध जातींच्या पक्ष्यांचे दर्शन घडत असते. त्यातील बहुतांश जातीचे पक्षी बाराही महिने परिसरामध्ये वास्तव्यास असतात . परिसरातील येरळवाडी, सुर्याचीवाडी, मायणी, कानकात्रे व परिसरामध्ये असलेल्या विविध तलावांमध्ये या पक्ष्यांचे दर्शन नित्यनेमाने घडत असतात. सर्वांना आकर्षक असलेले व हजारो मैलांवरुन येणारे फ्लेमिंगो हे या परिसराचे मुख्य आकर्षण असते.
सूर्याचीवाडी तलावांमध्ये पहिल्यांदाच ‘बार हेडेड गुज’ म्हणजेच (पट्टेरी हंसांचे) आगमन झाले आहे. सुमारे २२ पक्षांचा हा थव्याने तलावाचे सौदर्य वाढवले आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे फ्लेमिंगोचे आगमन थोडे लांबल असले तरी परिसरामध्ये विविध जातींचे पक्षी पाहण्यासाठी पक्षी मित्र पक्षी अभ्यासक येत आहेत. अभ्यासकांच्या मते जानेवारीच्या मध्यानंतर परिसरामध्ये फ्लेमिंगोचे आगमन होऊ शकते.
You must be logged in to post a comment.